Menu

मुख्य पान

image_pdfimage_print


महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, मुंबई मध्ये आपले स्वागत आहे.आमच्या संस्थेची काही ठळक ध्येय व उद्देश खालील प्रमाणे :

 • गरीब व मागासवर्ग समाजात बंधुभाव, स्नेहभाव, सहकार्याची भावना आणि राष्ट्राभिमान निर्माण करणे.
 • धर्मादाय आरोग्य शिबिरे , नेत्र चीकीस्ता शिबिरे, कुटुंब नियोजन शिबिरे वगेरे आयोजित करून समाजातील दुर्बल घटकांना त्याचा लाभ मिळवून देणे.
 • गरीब-गरजू, लायक विद्याथ्यांना वह्या, पुस्तके , गणवेश , लेखन सामुग्री , शिष्यवृत्ती वगेरे आर्थिक मदत करणे आणि त्यांना शिक्षणास उत्तेजन देणे .
 • मुंबईसह राज्यातील महत्वाच्या शहरात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक संशोधन केंद्राची स्थापना करून सर्व जनतेचा विकास साधणे.
 • गरीब, विधवा, परित्यक्ता, निराधार महिलांसाठी आधार केंद्र चालविणे, शिवणकाम वर्ग, हस्तकला वर्ग, महिला लघुउद्योग प्रशिक्षण केंद्र, संचालन करणे, नियंत्रण करणे.
 • अंगणवाडी, बालवाडी, बाल संस्कार केंद्रे , प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, तांत्रिक शाळा, तंत्रनिकेतने, महाविद्यालये, प्रौढ साक्षरता केंद्र, आश्रमशाळा, वसतिगृह , वृद्धाश्रम, वैद्यकीय महाविद्यालये आदि चालविणे.
 • समाजातील गरीब, होतकरू विद्याथ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवून त्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी मार्गदर्शन करणे .
 • वधु-वर, पालक परिचय मेळावे आयोजित करून सामुहिक विवाहास मान्यता देणे व समाजातील विवाह-जुळणी समस्या सोडविणे
 • तालीम संस्था, व्यायाम शाळा व क्रीडा अकादमी स्थापना करून विविध क्रीडा स्पर्धाचे व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे, देशी विदेशी खेळाणा प्रोस्ताहन देणे
 • कला, नाट्य, पारंपरिक गीते, धनगरी ओव्या, गजनृत्य इत्यादीद्वारे समाजात जनजागृतीचे कार्य करणे व संस्कृतीचे जतन करणे
 • समाजातील गरजू बांधवाना वैद्यकीय सहाय्य करणे
 • चर्चासत्रे, व्याख्याने, संमेलन, धार्मिक, राष्ट्रीय सण, उत्सव,कर्तबगार, गुणी विद्याथ्याचे सत्कार व गुणगौरव सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, मेळावे आयोजित करणे , सहकार्य देणे आणि सहकार्य घेणे